# 1554: योगेश्वर आणि योगमाया. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 436415185 series 3431535
ती बालिका, योगमाया, देवकीच्या मांडीवर विसावली. देवकी बाळंत झाल्याची वार्ता कंसाला समजताच तो त्या नवजात बाळाची हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी धावत आला. देवकीच्या मांडीवरचं बाळ त्यानं दोन्ही पायांना धरून उचललं आणि हवेत गरागरा फिरवलं. आता तो तिला फरशीवर आपटणार तोच, त्या योगमायेनं कंसाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेऊन स्वर्गाकडे उड्डाण केलं आणि कंसाला आकाशवाणी करून सांगितलं की "मुढा, मला मारून काय होणार? तुझा मारेकरी तर आधिच जन्माला आलेला आहे."
1625 tập