# 1576: जो दुसऱ्यावरी विसंबला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 440807441 series 3431535
जो दुसऱ्यावरी विसंबला| त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला| तोचि भला ||
असे समर्थ रामदास स्वामी का सांगतात?
ही छोटीशी गोष्ट ते खूप छान समजावते.
चिमणी रोजच्याप्रमाणे आपल्या इवल्याशा चोचीतून पिलांसाठी दाणे घेऊन घरट्यात आली. पिल्लं उदास होती. चिमणीने विचारले, काय झाले, तुम्ही उदास का? पिल्लं म्हणाली, 'आई, शेतकरी आला होता, तो सांगत होता, ‘उद्या त्याची मुलं येऊन झाडाची कापणी करणार आहेत. मग आपण बेघर होऊ, याच विचाराने आम्ही उदास आहोत!' चिमणी म्हणाली, 'काळजी करू नका पिलांनो, उद्या कोणी येणार नाही. तुम्ही अगदी निश्चिन्त राहा.' दुसऱ्या दिवशी खरोखरच, कोणीच आले नाही.
1625 tập